
Principal
Disha Sanskar Balak Vidya Mandir.
Principal's Message
प्रिय मुलांनो,पालकांनो आणि इतर मित्र मैत्रिणींनो,
“आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेत आपल्या गुणांना आणि कलागुणांना पूर्णक्षमतेने जगापुढे मांडणे ही काळाची गरज आहे.
विद्यार्थी जीवनाचा पाया घडतो तो पूर्व प्राथमिक वर्ग पूर्वी बालवाडी मध्ये त्यामुळे हा घटक मुलांच्या जडणघडणीत फार महत्त्वपूर्ण आहे. दिशा संस्कार बालक विद्या मंदिर निरंतर अनेक उपक्रम राबवून मुलांना क्रियाशील बनवण्याचा प्रांजळ प्रयत्न करते. विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, स्नायूंचा विकास, स्वावलंबन, बौद्धिक विकास, आत्मविश्वास, क्रियाशीलता, संस्कार, नैतिक मूल्य, वैज्ञानिक दृष्टीकोण, निसर्गावर प्रेम, सामान्यज्ञान वाढीस लागावे यासाठी अनेक उपक्रम शाळा राबवत असते.
गरीब, कनिष्ठ, मध्यमवर्गीय परंतु पाल्यांना उत्तम चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा मानस असलेले पालक या शाळेचे एक 'वैशिष्ट्य' आहे. हातावर पोट असलेल्या पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे फारसे लक्ष देता येत नाही, शाळेला याची जाणीव आहे म्हणूनच वैयक्तिक स्वच्छतेपासून संस्कृती सणाच्या महतीपर्यंत, थोर भारतीय परंपरा आणि इतिहास यांची ओळख, अभ्यास, खेळ इ. अनेक गोष्टी ज्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी जे जे शक्य असेल ते ते घटक देण्याचा दिशा संस्कार बालक विद्या मंदीर प्रयत्न करते.
सद्यस्थितीस ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जात आहे. ”
"मुलांचा सर्वांगीण विकास हाच दिशाचा ध्यास".
Principal
Disha Sanskar Balak Vidya Mandir.
Bank Name:State bank of india
Name of A/C Holder : Prachi Omkar Badve
Account No: 33733464137
IFS Code : SBIN0000303
Phonepe/Google pay : 7798489209